Facilities
Facilities
- 20 bedded dedicated women’s speciality hospital.
- Dedicated team of highly qualified obstetricians & Gynecologists & anaesthesiologists
- Spacious waiting area (प्रशस्त प्रतीक्षालय विभाग)
- Private/Semi private rooms (खासगी/अर्धखासगी विभाग)
- Well-equipped 2 operation theatres with anaesthesia work-station (अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर)
- Delivery room with NST machine (प्रसूती कक्ष)
- Painless normal delivery (वेदनारहित प्रसूती)
- Caesarean section (सिझेरियन डिलिव्हरी)
- Government approved safe MTP centre (मान्यताप्राप्त सुरक्षित गर्भपात केंद्र)
- Family planning operation (लहान कुटुंब सुखी कुटुंब योजना)
- High risk pregnancy care (अतिजोखमी गर्भधारणा आणि प्रसूती)
- Sonography services (सोनोग्राफी)
- Recurrent pregnancy loss treatment (वारंवार होणाऱ्या गर्भपातावर उपचार)
- Gynaecological surgeries: Laparoscopy and Hysteroscopy (गर्भाशयातील व अंडाशयातील गाठींच्या विविध प्रकारच्या लॅप्रोस्कोपी शस्त्रक्रिया)
- Adolescent health clinic and vaccination (किशोरवयीन मुलींचे समुपदेशन व लसीकरण)
- Menopause clinic (रजोनिवृत्ती समस्या व उपचार)
- Infertility services IUI/IVF/ICSI/IMSI (वंध्यत्व निदान)
24 X 7 EMERGENCY SERVICES | 24 X 7 PHARMACY AND PATHOLOGY LAB
गर्भावस्थेत घ्यावयाची काळजी व सूचना
प्रसूती पूर्व आवश्यक तपासणी
- पहिले सात महिने दर महिन्याला
- आठव्या महिन्यात दर पंधरा दिवसांनी
- आवश्यक (Emergency) परिस्थितीत त्वरित तपासणी
खालील परिस्थितीत त्वरित डॉक्टरांकडे जावे
- पोटात दुखू लागल्यास • योनीमार्गातून पाणी / गाठळ्या अथवा रक्त जाऊ लागल्यास • बाळाची हालचाल कमी अथवा बंद झाल्यास
- तीव्र डोके दुखणे, डोळ्यासमोर दिसेनासे झाल्यास, पायावर चेहऱ्यावर सूज येणे • झटके येत असल्यास • सततच्या उलट्या होत असल्यास
- ताप येत असल्यास
गर्भवती स्त्रियांसाठी आहार
- गर्भावस्थेत बाळाच्या योग्य वाढीसाठी आईने सकस, परिपूर्ण, पोषक व अधिक उर्जायुक्त (Extra Calories) आहार घ्यावा.
- सर्व प्रकारच्या हिरव्या पालेभाज्या, सोयाबीन, दाणे, डाळी, बीट, फळे सर्व प्रकारच्या डाळी, कडधान्ये भरपूर खावे.
- तेलकट, मसालेदार व चटकदार पदार्थ जास्त खाऊ नयेत. • शुद्ध (R.O. Treated) / उकळलेले पाणी भरपूर प्यावे.
गर्भवती स्त्रियांसाठी सूचना
- धनुर्वाताची दोन इंजेक्शन गर्भावस्थेच्या 16 ते 24 आठवड्यात एक महिन्याच्या अंतराने घ्यावी.
- डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधे/टॉनिक नियमितपणे पूर्ण गर्भावस्थेत चालू ठेवावे. त्यामुळे बाळाची वाढ व्यवस्थित होईल.
- रोज दुपारी दोन व रात्री 8 तास झोप घ्यावी. • आईने एका कुशीवर झोपावे.
- वारंवार गर्भपात, अकाली दिवसांमध्ये डिलिव्हरी, पूर्वी सिझेरियन असल्यास जास्त काळजी घ्यावी.
- सोनोग्राफी: दुसऱ्या, तिसऱ्या, पाचव्या व नवव्या महिन्यात डॉक्टरांच्या सल्ल्याने करावी.
- जड शारीरिक श्रमाचे कामकाज करणे, शारीरिक श्रम टाळावे. • पहिल्या व शेवटच्या 3 महिन्यात संबंध टाळणे.
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध न घेणे. • पहिले चार महिने एक्स-रे टाळणे.
बाळासाठी सूचना
- बाळाला 24 तासात शौचास व 48 तासात लघवी होते.
- प्रसूतीनंतर शक्य तितक्या लवकर 1 तासात बाळाला आईचे अंगावरचे दूध पाजावे.
- बाळाला दूध पाजल्यानंतर ढेकर येईपर्यंत खांद्यावर ठेवावे. • बाळाच्या कानात, नाकात व डोळ्यात काहीही टाकू नये.
- बाळ सर्दी, पिवळसर दिसत असल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.
- बाळाला नियमित लसीकरण करावे. (लसीकरण मुलांच्या बाळाला भल्यासाठी आहे.)
प्रसूतीसाठी अॅडमिट होताना खालील गोष्टी घेऊन येणे.
- बाळाचे कपडे (कॉटन) - 4
- बाळासाठी लंगोट (कॉटन) - 8
- बाळासाठी झबले (कॉटन) शक्यतो बटनचे नसावे, बांधायचे बंद असावे - 8
- बाळासाठी सॉक्स - 2 जोड
- हिवाळ्यात बाळासाठी स्वेटर - 1 जोड
- बाळाचे पांघरूण - 1
- आईसाठी समोरील बटनांचा / फिडिंग गाऊन
- बाळासाठी रबर / प्लास्टिकचे शीट
- पाणी गरम करण्याची केतली
- उकळून निर्जंतुक केलेले वाटी व चमचा (प्रत्येकी 6)